Pimpri News : एकाच मंचावर एकाच वेळी कविता व चित्रकलेचा प्रेक्षकांनी लुटला आनंद

एमपीसी न्यूज – राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या लोकप्रिय कवींच्या हृदयस्पर्शी व वास्तवाला भिडणाऱ्या कवितांची पेशकश, जोडीला नामवंत महिला चित्रकार व शिल्पकारांनी (Pimpri News) हुबेहूब सादर केलेल्या कलेच्या आविष्काराचा आनंद शनिवारी (दि.7) प्रेक्षकांनी लुटला.

निमित्त होते जागतिक मराठी अकादमी व डॉ डी. वाय. पाटील विद्यापीठ,पिंपरी आयोजित 18 व्या जागतिक मराठी संमेलनात सादर झालेल्या ‘चित्र- शिल्प- काव्य या कार्यक्रमाचे….!’ संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रातील शेवटचा हा कार्यक्रम गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरला. नामवंत कवी व माजी संमेलनाध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर तसेच महेश केळुसकर आणि श्रीकांत कदम यांनी सूत्रधार म्हणून वेसण हाती घेतलेला हा कार्यक्रम तब्बल साडेतीन तास रंगला.

सुरभी गुळवेलकर या मुलीने अशोक नायगावकर यांचे समोर बसून काढलेले चित्र, हर्षदा कोळपकर यांनी काढलेले रचनाचित्र तर राज्यातील पहिल्या महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी जेष्ठ पत्रकार रजनीश राणे यांचे समोर बसवून निर्माण केलेले शिल्प या कार्यक्रमाचा आकर्षण ठरले.

Pune News : पवना धरणात बुडून एका शिक्षकाचा मृत्यू

कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथून आलेल्या जवळपास 28 कवींनी त्यांच्या कवीता सादर केल्या.कवी प्रशांत मोरे यांच्या रचनेने काव्य मैफिलीला सुरुवात झाली. त्यानंतर इंद्रजीत घुले यांच्या ‘लग्नातलं जेवण’ या कवितेने हास्याचा धुरळा उडवून टाकला. (Pimpri News) लता अहिवळे यांच्या ‘बाप ‘नावाची शीर्षक असलेल्या कवितेने प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या तर भरत दौंडकर यांनी ‘अंदाज येत नाही’ ही कविता सादर करून सद्यस्थितीतील राजकारणावर जोरदार अष्टोप्रहार केला. नारायण पुरी यांच्या ‘जांगडगुत्ता’ कवितेने तर वन्समोअर गजर उठविला. प्रशांत होळकर, तुकाराम हंडोरे, नितीन देशमुख, मीनाक्षी पाटील, शशिकांत तिरटकर ,साहेबराव खांडगे,विनायक कुलकर्णी, अरुण म्हात्रे यांच्या कवितांनाही रसिक प्रेक्षकांनी दाद दिली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एन.जे.पवार, या जागतिक संमेलनाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर मुळे, अशोक नायगावकर, फ.मु. शिंदे यांनीही शेवटी आपल्या कविता सादर करून या काव्य मैफिलीला परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी‌ पाटील यांनी सर्व कवींचा तसेच चित्रकार व शिल्पकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.