शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

कोणताही प्रश्न न सोडविल्याने पुणे महापालिका सत्ता भाजपकडे -गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक निकाल आज लागला. यामध्ये दोन्ही महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर सत्ता असूनही सत्ताधा-यांना कोणताही प्रश्न सोडवता न आल्याने जनतेने सत्ता भाजपच्या हातात दिली, असे पालकमंत्री गिरीश बापट सांगितले.

 

पुणे महापालिका निवडणूक विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

यावेळी गिरीश बापट असेही म्हणाले की, सत्तेत असताना सत्ताधा-यांवर अनेक आरोप होत होते. मात्र, याचे कोणतेही स्पष्टीकरण सत्ताधा-यांनी दिले नाही. त्यामुळेच जनतेने भाजपकडे सत्ता सुत्रे सोपविली असून भाजप वचनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करणार, असेही त्यांनी सांगितले.

spot_img
Latest news
Related news