तळेगाव दाभाडेमध्ये नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे तरुणाने नैराश्यातून टॉवेलच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.25) दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे हद्दीतील नॅशनल हेवी कंपनी जवळील वनक्षेत्राच्या डोंगरावर घडली.

कृष्णा रामदिनी चव्हाण (वय 30 रा. बाबूसेला, कोहीनी नाझा जि. गोपालगंज बिहार), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  कृष्णा चव्हाण याने झाडाला गळफास घेतल्याची खबर सर्पमित्र निलेश  गराडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली.



मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एन. डी. साळुंखे करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.