शनिवार, डिसेंबर 3, 2022

बोलायला हुशार हे अनेकांनी स्वीकारले, ते पुणेकरांनी सिद्ध केले – शरद पवार

एमपीसी न्यूज – ”मैत्री अनेकांशी असते राजकारणात बोट धरून आलो, असे बोलले, असे सांगतात. ते खरे नसतात. माणसे बोलायला हुशार आहेत हे अनेकांनी स्वीकारले आहे. त्यावर लोक विश्वास ठेवतात. हे पुणेकरांनी सिद्ध केले आहे, असे भाष्य करीत त्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला पुणेकरांनी स्पष्ट बहुमत दिले,” असे शरद पवार यांनी आज एका मुलाखती दरम्यान सांगितले.

पुण्यात आज 12 व्या राम कदम पुरस्कार समारंभाप्रसंगी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार, प्रतिभा पवार आणि अनुराधा पौडवाल यांची मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान, ‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो,’ असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी तीन महिन्यापूर्वी केले होते. त्या विधानाबाबत शरद पावर यांना विचारले असता त्यांनी वरील मार्मिक उत्तर दिले.

बालगंधर्व रंगमंदिरात 12 वा राम कदम पुरस्कार समारंभा पार पडला. यंदा प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, १ लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रतिभा पवार, महापौर प्रशांत जगताप, प्रभाकर जोग, इनॉक डॅनीयल आदी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार, प्रतिभा पवार आणि प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची मुलाखत घेतली. या दरम्यान शरद पवार यांनी मनमोकळ्यापणे उत्तरे दिली.

राजकारणाच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्या दरम्यान पुण्यात कट्यावर सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळीनी चहा नाष्ट्यासाठी एकत्र आले. ही चांगली बाब आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले की, राजकारणात संघर्ष असावा. मात्र तो विचारांचा आणि लोकांच्या हिताचा असावा. तसेच राजकारणात वैयक्तिक संघर्ष नसावा. कोणाचे गाणे अधिक आवडते या प्रश्नावर ते म्हणाले की, पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी अमोणकर यांची गाणी अधिक आवडतात, असे त्यांनी सांगितले.

तुम्हाला एवढ्या वर्षात पवारांच्या चेहऱ्याकडे पाहून लगेच समजते का ? असा प्रश्न प्रतिभा पवार यांना विचारला असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. यावर पवार यांनी लगेच माईक हाती घेत म्हणाले की, आयुष्यात गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले आणि आज ही विकेट गेली सांगताच सभागृहात हशा पिकला.

तर तुम्हाला कोणती गाणी आवडतात असे विचारले असता, काळ्या मातीत मातीत, सत्यम शिवम सुंदरम, जिवलगा, अशी अनेक गाणी आवडतात. त्यांनी यावेळी गाणी सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Latest news
Related news