राज्यभरात बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

पिंपरी-चिंचवडमध्ये 17 परीक्षा केंद्र; भरारी पथकांची राहणार नजर
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा आजपासून (दि. 28) सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 17 परीक्षा केंद्रावर बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे 21 हजार 62 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत.
 
या परिक्षेच्या काळात कॉपीमुक्‍त परीक्षा होण्यासाठी दहा अधिकाऱ्यांची दोन भरारी पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 17 परिक्षा केंद्रावर आजपासून (मंगळवार) ते 25 मार्च 2017 पर्यंत बारावीच्या परिक्षा सुरु राहणार आहे.

 
यामध्ये दापोडीच्या स्वामी विवेकानंद कॉलेज केंद्रावर 2 हजार 87 विद्यार्थी, चिंचवडच्या नागनाथ मारुती गडसिंग कनिष्ठ विद्यालयावर 483 विद्यार्थी, फत्तेचंद जैन हायस्कूल व ज्युनियक कॉलेजवर 2 हजार 4 विद्यार्थी, पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात 1 हजार 183 विद्यार्थी, जयहिंद हायस्कूलमध्ये 1 हजार 503 विद्यार्थी, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये 1 हजार 150 विद्यार्थी, आकुर्डीच्या म्हाळसाकांत विद्यालयात 3 हजार 9 विद्यार्थी, सेंट उर्सुला हायर सेकेंडरी स्कूलमध्ये 543 विद्यार्थी, मोरवाडीच्या कस्तुरी देवी जयप्रकाश गुप्ता ज्युनियर कॉलेजवर 1 हजार 24 विद्यार्थी, चिंचवडचे गोदावरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 हजार 206 विद्यार्थी, निगडीतील शिवभूमी विद्यालयात 1 हजार 393 विद्यार्थी, प्रेरणा कनिष्ट महाविद्यालयात 991 विद्यार्थी, भोसरीचे भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयात 1 हजार 815 विद्यार्थी, राजमाता जिजाऊ कॉलेजमध्ये 589 विद्यार्थी, सयाजीराव महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 हजार 122 विद्यार्थी, ताथवडेचे बालाजी ज्युनियर कॉलेजमध्ये 400 विद्यार्थी, थेरगांवच्या मराठवाडा कॉलेजमध्ये 560 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

"exam"

"exam
"exam

 
 
 
 
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.