कर वसुली मोहिमांतर्गत कर चुकव्यांची मिळकत होणार जप्त

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मिळकत कर व पाणीपट्टी कर वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली असून कराचा भरणा न करणार्‍यांची मिळकत जप्त करणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार व कर निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले सर्व मिळकत धारकांना कराचा भरणा करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. कर भरण्याचा हा शेवटचा महिना असताना काही मंडळी करभरणा करण्याकडे कानाडोळा करत आहेत अशांच्या मिळकत ताब्यात घेण्यात येणार असून कर न भरणार्‍यांची नावे नागरिकांना माहिती व्हावीत याकरिता मुख्य चौकांमध्ये लावण्यात येणार आहेत.

लोणावळा नगरपरिषदेने 100 टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करून कराचा भरणा करावा, असे आव्हान नगरपरिषदेने केले आहे. याकरिता कार्यालयीन कामाकाजांच्या वेळांसह शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टयांच्या काळात देखील नगरपरिषद कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.