बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

प्रदूषणमुक्त विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी या संस्थेतर्फे विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रदूषणमुक्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन संस्थेच्या सचिव आरती राव यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन घेण्यात आले होते. यामध्ये व्हॅक्यूम क्लिनर, वर्किंग ऑफ हायड्रोलिक जेसीबी, मॉडेल्स ऑन नॅचरल रिसोर्सेस अशा विविध प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. दरम्यान ‘विज्ञानातील असे का ? यावर आधारित ‘डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका, हे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकही उपस्थित होते.

यावेळी सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या भौतिकशास्त्रातील ‘रामन इफेक्ट’ या नोबेल विजेत्या शोधाच्या प्रित्यर्थ हा दिवस विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आरती राव यांनी सांगितले. तसेच विज्ञानाचे महत्त्वही विशद केले.

spot_img
Latest news
Related news