शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

एसएनडीटीची कन्या शारदा सोनवणे पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकपदी

शारदा सोनवणे यांची पार्लर ते नगसेवक पदापर्यंतची वाटचाल

एमपीसी न्यूज- महिलांना सक्षम बनविणा-या एसएनडीटीमध्ये शिक्षण घेणारी एसएनडीटीची कन्या आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकपदी विराजमान झाली आहे. हि कथा आहे सांगवीच्या प्रभाग क्रमांक 32 मधील नवनिर्वाचित नगरसेविका शारदा सोनवणे यांची. सोनवणे यांनी 13 वर्ष पार्लर व त्यानंतर आता थेट नगरसेवकपद अशी यशस्वी वाटचाल केली आहे.

सोनवणे यांचे सासरे अशोक सोनवणे हे भाजपचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते आहेत. ते माजी नगरसवेक ही आहेत, या पार्श्वभूमीवर शारदा सोनवणे यांनी महापालिका निवडणुकीत पाऊल ठेवले व विजयही मिळवला. याविषयी बोलताना  शारदा सोनवणे म्हणाल्या की, मी कधी राजकारणात येण्याचा विचार केला नव्हता. मी मागील 13 वर्षांपासून पार्लरचा व्यवसाय करतेय. माझ्या सास-यांनी व घरच्यांनी मला निवडणुकीसाठी प्रवृत्त केले. दरम्यानच्या काळात मी 15 बचतगट माझ्या परिसरात चालवते. पार्लर व बचतगट यांच्यामुळे माझा महिलांशी  संपर्क होता, त्यांच्या जवळची व्यक्ती निवडणुकीला उभारली आहे म्हणल्यानंतर त्यांनी खूप मदत केली, असेही सोनवणे यांनी सांगितले.

शारदा हिरेन यांचे माहेर खानदेशचे मात्र त्यांचे बालपण गेले ते भिवंडी येथील  पडघा गावी. वडील मुख्याध्यापक होते. त्यावेळी त्यांनी पदविकेसाठी मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महाविद्यालात प्रवेश घेतला. पदविकेच्या दुस-याच वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र त्यांची एनएनडीटीची नाळ तुटली नाही. त्यांनी लग्नानंतर  पदवी पूर्ण केली.

याविषयी बोलताना सोनवणे म्हणाल्या की, मला गर्व आहे की मी एसएनडीटीमधून शिकले आहे. आजही मी माझ्या प्राध्यापिका आढाव मॅडमच्या संपर्कात आहे. त्यांनी स्त्री सबलीकरणाचे जे धडे दिले होते ते माझ्या आयुष्यभर कामी येणार आहेत. त्यामुळेच अगदी पार्लर ते नगरसेवक पद मी गाठू शकले. मी त्यांना माझ्या यशाबद्दल सांगितले तेव्हा त्यांना खूप  आनंद झाला. आजही त्या मला आताही आवर्जून भेटतात. मी माझ्या मुलीलाही एसएनडीटीतच शिक्षण देणार आहे.  स्त्री सबलीकरणाचे जे मी धडे घेतले त्या प्रमाणे मला माझ्या प्रभागातील महिलांना शिक्षण द्यायचे आहे, त्यांनाही व्यवसासासाठी प्रवृत्त करायचे आहे. त्यामुळे मला खासकरुन महिलांच्या समस्यावर भर द्यायचा आहे. तसेच प्रभागातील कचरा, पाणी समस्या, जलपर्णी   याबबतही मी काम चालू केले आहे.

माझ्या या यशात जसा एसएनडीटीचा वाटा आहे तसाच माझे कुटुंबीय, पती, आई-वडील यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या सहकार्य व पाठींब्यामुळे मी नगसेवक झाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

"sharda

spot_img
Latest news
Related news