काळेवाडीत शिवजयंती उत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज – फाल्गुन कृष्ण तृतीया या तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 387 वी जयंती काळेवाडी येथे अखिल तापकीरनगरमध्ये उत्साहात  साजरी करण्यात आली.

यावेळी शिवप्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर,  आझाद मित्रमंडळ  स्पोर्टसचे अध्यक्ष अतुल नढे,  पतंगराव सुतार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी निलेश तापकीर,संतोष लिंगकर, महेश  शिंदे, विशाल सकपाळ, अभिषेक वाळके,  अतिश कांबळे, गणेश शिंदे, राहूल बनकर,  अनिकेत मोरे, शुभम गायकवाड, शैलेश पाटोळे, स्वप्नील  बांदल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन विनोद तापकीर युवा मंचने केले होते. 

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.