शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

जीवनात प्रामाणिकपणे काम करा यश निश्चित मिळेल – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे काम करा जीवनात यश निश्चित मिळेल असे मत तळेगाव नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश भेगडे यांनी व्यक्त केले. लोणावळा नगरपरिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षण क्रीडा व सांस्कृतीक कार्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कला, क्रीडा, बौध्दिक व सांस्कृतीक महोत्सव बक्षीस समारंभात भेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभासाठी पुणे जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने, शिक्षण समिती सभापती अपर्णा बुटाला, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, नगरसेवक बाळासाहेब जाधव, रचना सिनकर, पुजा गायकवाड, मंदा सोनवणे, देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, गौरी मावकर, सुधिर शिर्के, सुर्वणा अकोलकर, कल्पना आखाडे, संध्या खंडेलवाल, सेजल परमार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फाटक, जितेंद्र टेलर, संजय आडसुळे, बाबासाव शेख, आमन पठाण, भाजपा अध्यक्ष बाबा शेट्टी, उपाध्यक्ष सुनिल तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.


भेगडे म्हणाले शालेय जीवनात ज्या ज्या गोष्टी अनुभवायला मिळतात त्या शिका, शिक्षण मंडळे काही अपवादात्मक घटनांमुळे बरखास्त झाली मात्र यामुळे शाळांकडे दुलर्क्ष होऊ शकते याकरिता शिक्षण मंडळे पुर्नजिवित करा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्याने विद्यार्थी संख्या कायम ठेवण्यासाठी शिक्षण मंडळ शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण द्या असे आवाहन भेगडे यांनी केले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर म्हणाले मावळ तालुका शिक्षणाच्या माध्यमातून समृध्द करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे.


मागील वर्षभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती अपर्णा बुटाला यांनी केले तर नगरसेविका गौरी मावकर यांनी आभार मानले. प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने यांनी शिक्षण मंडळाचे कार्य व शाळां यांच्या प्रगतीपुस्तकांचे सादरीकरण मनोगतांतून केले.

"dipex"

spot_img
Latest news
Related news