पुणे शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन आणि डूयॉथलॉन स्पर्धा

एमपीसी न्यूज – जायंट स्टारकेन स्पोर्ट्स प्रा. ली. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिटनेस आणि वेलनेस (आयआयएफडब्लू) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन आणि डूयॉथलॉन (पीआयटीडी) चे आयोजन करण्यात आले.  या स्पर्धा 19 मार्च रोजी पुण्यातील भूगाव येथील मानस लेक रिसोर्ट येथे होणारआहेत.या स्पर्धेसाठी 850 पेक्षा अधिक आरोग्य आणि सायकलिंग प्रती जागरूक असलेले स्पर्धक सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांचा अवलंब करून आयोजित करण्यात येणा-या या स्पर्धा पुणे शहरात प्रथमच होणार आहेत.

या स्पर्धेसाठी देशातील विविध शहरातून या साठी स्पर्धक येणार असून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, नवी मुंबई, बारामती, बीड, नाशिक, कोल्हापूर, मैसोर, नोयडा इत्यादी शहरातील स्पर्धकांचा यात समावेश आहे. याचबरोबर साउथ आफ्रिका आणि अमेरिका या देशातून देखील काही आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेदरम्यान सर्व रेसेससाठी आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन नियमांचा अवलंब करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ट्रायथलॉन आणि डूयॉथलॉन अशा दोन प्रकारांमध्ये विभागला असून ट्रायथलॉन मध्ये स्विमिंग, बायकिंग आणि रनिंग असे तीन प्रकार आहेत तर डूयॉथलॉन मध्ये रनिंग आणि बायकिंग अशे दोन प्रकार असणार आहेत. प्रत्येक रेसमध्ये स्प्रिंट, ओलंपिक आणि हाल्फ मॅराथॉन असे तीन उपप्रकार असून लहान मुलांसाठी दोन्ही प्रकारांमध्ये वेगळा गट आहे. प्रत्येक प्रकारांमध्ये स्विमिंग, रनिंग आणि बायकिंगचे वेगवेगळे अंतर असणार आहे. ट्रायथलॉन मानस लेक पासून सुरु होउन बालेवाडी कॉम्प्लेक्स मध्ये त्याचा शेवट होणार आहे तर डूयॉथलॉन बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये होणार आहे.

श्री प्रवीण पाटील, एमडी आणि सीईओ स्टारकेन स्पोर्ट्स प्रा. ली. आणि डॉ आनंद पाटील, संस्थापक आयआयएफडब्लू यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. आरोग्याचे मोजमाप करणे आणि स्वस्थ आणि निरोगी आयुष्ययाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 या प्रसंगी बोलताना श्री प्रवीण पाटील, एमडी आणि सीईओ स्टारकेन स्पोर्ट्स प्रा. ली. म्हणाले कि, “ आम्हाला पुण्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन आणि डूयॉथलॉनचे (पीआयटीडी) आयोजन करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय नियमावलीचे पालन करून घेण्यात येणारा हा भारतातील पहिलाच कार्यक्रम आहे. सायकलिंग या खेळाचा प्रसार करण्याचे आमचे ध्येय आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमामुळे निश्चितच खेळ आणि त्याचे जीवनशैलीवर होणारे चांगले परिणाम याविषयी जागरूकता आणि प्रसार होण्यास मदत होईल तसेच आरोग्याचे मोजमाप करण्यास महत्व प्राप्त होईल.  आज केवळ व्यायाम किंवा खेळ हा गरजेचा नसून प्रत्येकाला आपल्या आरोग्याप्रमाणे कोणता व्यायाम किंवा खेळ उपयुक्त आहे हे समजणे गरजेचे आहे. मला आयआयएफडब्लूचे आरोग्य मोजमाप करण्याच्या प्रणालीबाबत जागरूकता करण्याच्या कामाबद्दल अभिनंदन करावेसे वाटते. त्याचबरोबर मानस लेक रिसोर्टचा देखील मी आभारी आहे कि त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला अतिशय सुंदर असा परिसर आम्हाला प्राप्त करून दिला. या उपक्रमाबरोबरच आयआयएफडब्लू सोबत भविष्यात देखील त्यांच्या इतर उपक्रमाला साथ देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.