वाकडमध्ये जुन्या भांडणातून एकाला स्टम्पने मारहाण

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने एकाला स्टम्पने बेदम मारहाण केली. शुक्रवारी (दि.17) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे ही घटना घडली. 

याप्रकरणी भो-या घाडगे, किरण घाडगे, रवींद्र घाडगे, सागर घाडगे, नागेश भंडारी (सर्व रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बापु हेगडे (वय 45, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी हेगडे यांचा मित्र बाळू वझे व आरोपी रिक्षाचालक आहेत. दोन दिवसांपूर्वी बाळू वझे आणि भो-या घाडगे या दोघांची डांगे चौक येथील रिक्षा स्टॅन्डवर प्रवासी घेण्यावरुन भांडणे झाली होती. 

शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बापु हेगडे, बाळू वझे, सुशांत लोखंडे हे तिघे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी एका रिक्षामधून तिथे आले. भो-या याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी बापु हेगडे यांना स्टम्पने डोक्यात, पाठीवार बेदम मारहाण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.