कब बुलबुल पथकाकडून हेल्मेट घालणा-या वाहनचालकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन शाळेत शिशुविहारच्या बनीटमटोला व प्राथमिक विभागासाठी कब बुलबुल पथकाचे उद्घाटन करण्यात आले.

बनीटमटोला आणि कब बुलबुल या दोन्ही पथकाच्या विद्यार्थ्यांनी चिंचवड स्टेशन चौकात हेल्मेट घालून वाहन चालवणा-या वाहन चालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. तर हेल्मेट न वापरणा-या वाहन चालकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी जयप्रकाश राका, राजेंद्रकुमार राका उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आर. एच. गारगोटे, व्ही. के. मुसळे, व्ही. एस. जगताप यांनी केले. मार्गदर्शन मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.