ST Employees : राज्य सरकारने दिले 300 कोटी; एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार!

एमपीसी न्यूज : मकरसंक्राती निमित्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Employees) राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला असून एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार आहे अशी माहिती समोर आली. याही महिन्यात कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसून एसटी कर्मचारी संघटनाने आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु, आता या बातमीने त्यांचा राग निवळण्याची शक्यता आहे.

Pune News : आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने कारखान्यातील दुर्घटनेत जखमी झालेल्या तरुणीला दिले जीवदान

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीनशे कोटी रुपये वितरित केले असून या मध्ये फक्त नेट पगार असणार आहे. त्यामध्ये ग्रॅज्युअटि आणि पीएफचे पैसे यांचा समावेश नसणार आहे. या आधी केलेल्या आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे पगार सात ते 10 तारखेपर्यंत होणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र काही महिन्यापासून हे आश्वासन पाळले जात नव्हते. नववर्षाच्या पहिल्या महिन्यात, सणांच्या तोंडावर 12 तारीख उलटली (ST Employees) तरी पगार झाला नव्हता. त्यामुळे आजपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे तातडीने रोख रक्कम महामंडळाकडे राज्य सरकारने सुपूर्द केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.