Khadki news: शेकोटी पेटवून नका असे सांगितल्याने अल्पवयीन मुलांनी चिडून एका 35 वर्षीय तरुणाचा केला खून

एमपीसी न्यूज : शेकोटी पेटवून नका असे सांगितल्याने 5 ते 7 अल्पवयीन मुलांनी चिडून एका 35 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना खडकी येथे शनिवार – रविवारी रात्री घडली आहे.

आशिष कांबळे, वय 35 वर्षे, रा. सुरती मोहल्ला, अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी असे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रविण गायकवाड, वय 48 वर्षे, रा. सुरती मोहल्ला, खडकी यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताराचंद सुडगे, पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या बाबत अधिक माहिती देताना सुडगे म्हणाले की 5 ते 7-8 मुलांनी मिळून आशिष कांबळे यांचा खुन केला आहे. आरोपी मुले व मयत तरुण सुरती मोहल्ला येथेच राहतात.

सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालय उदघाटन सोहळा सोमवारी

त्यांच्यामध्ये शिवीगाळ व भांडण अंदाजे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी झाले होते. मयत कांबळे हे तेथील सार्वजनिक शौचालयकडे जात असताना त्यांनी काही मुलांना शेकोटी पेटवून बसलेले दिसले. तेथे जवळच एक गॅस वर चालणारा रिक्षा असल्याने कांबळे याने त्या मुलांना तेथे शेकोटी करू नये असे सांगितले व ते पुढे गेले.

त्यानंतर ती मुले इतर मुलांसोबत शौचालयाजवळ आले व कांबळे बाहेर आल्यावर त्याच्यावर कोयत्याने व इतर तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

सुडगे म्हणाले की एकूण पाच आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैक्की दोन आरोपी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पाच आरोपींच्या बरोबर त्यांचे 2 ते 3 इतर साथीदार यांनी हल्ला केला होता. त्यांच्याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.