Pimpri: शहरातील 62 टक्के रुग्णांची कोरोनावर मात तर 36 टक्के सक्रिय रुग्णांवर उपचार; मृत्यूदर 1.69 टक्के

सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त. सक्रिय रुग्णांपैकी 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. 62% Corona virus cases in Pimpri Chinchwad cured, 365 active covid19 patients in the city while date rate 1.69%

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 1654 जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1026 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 600 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 62.03 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

तर, 36.26 टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण 1.69 टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णांपैकी 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. पहिल्यांदा गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये शिरलेल्या कोरोनाने आता झोपडपट्यांमध्ये शिरकाव केला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. जूनअखेरपर्यंत तीन हजार रुग्ण संख्या होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

अंदाजानुसार शहरात दररोज 90 ते 100 नवीन रुग्णांची भर पडत आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यात रुग्ण वाढण्याचीही शक्यता वर्तविली आहे. 10 मार्च ते 20 जून दरम्यान रुग्ण संख्या 1654 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

शहरातील 1654 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1026 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 600 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील 28 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे. टक्केवारीनुसार पाहता तब्बल 62.03 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर, 36.26 टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.

सक्रिय 600 पैकी 92 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे

शहरातील 600 सक्रिय रुग्णांपैकी केवळ 92 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. तर, तब्बल 486 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. कोरोनासह विविध आजारांनी ग्रासलेल्या 20 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक 663 तरुणांना कोरोनाची बाधा

पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांना कोरोनाने अक्षरश: विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील तब्बल 663 तरुणांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयोगटातील प्रौढांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 425 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 213 किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 176 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 175 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.