Talegaon Dabhade : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी गणेश काकडे यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी येथील निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांची फेरनिवड करण्यात आली. धनकवडी (पुणे) येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्तीचे तसे पत्र काकडे यांना दिले आहे.

यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, नगरसेवक संतोष भेगडे उपस्थित होते.
गणेश काकडे हे मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असून सिद्धिविनायक प्रतिष्ठान आणि तळेगाव स्टेशन सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे संस्थापक आहेत. उत्कृष्ट प्रशासक म्हणून ते ओळखले जातात. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी तसेच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अधिकाधिक वेळ देणार असल्याचे निवडीनंतर गणेश काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.