Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथील शिबिरात 51 जणांचे रक्तदान

Blood donation of 51 people in the camp at Talegaon Dabhade कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा पडत असल्याने अवांतर खर्चाला फाटा देत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज- तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 51 जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्लबचे सचिव सचिन कोळवणकर, उपाध्यक्ष विलसेन्ट सालेर, प्रकल्प प्रमुख रूथ सालेर, तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव विलास टकले, खजिनदार सुदाम दाभाडे, प्रकल्प प्रमुख हनुमंत शिंदे यांच्यासह तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

रजनीगंधा खांडगे यांनी रक्तदान करून शिबिराला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा पडत असल्याने अवांतर खर्चाला फाटा देत या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोष खांडगे यांनी दिली.

कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था, मेथॉडिस्ट चर्च सेंटेनरी, तळेगाव स्टेशन, गरवारे ब्लड बँक यांनी केले. गणेश काकडे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.