Pune : पीएमपीएलला बंदचा फटका ; 45 हजारांचे नुकसान

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंद दरम्यान पुण्याची जीवन वाहिनी समजली जाणाऱ्या पीएमपीएलला लक्ष्य करण्यात आले. तीन ठिकाणी पीएमपीएल बसवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी रस्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएलचे 45 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पुणे येथे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके यांनी दिली.

कालच्या भारत बंदमध्ये पीएमपीएलच्या सहा बसच्या काचा फोडून तीन बसच्या टायर मधील हवा सोडण्यात आली. त्यामुळे महामंडळाला 45 हजार रुपयांचा फटका बसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बसवर झालेल्या दगडफेकीमुळे काही भागांतील वाहतूक विस्कळित झाली होती मार्केट यार्ड 10 नंबर गेट, चित्रशाळा, पंपिंग स्टेशन , नळस्टॉप, गुजरात कॉलनी, महानगरपालिका, संघर्ष चौक आदी ठिकाणी बसचे नुकसान करण्यात आले. न.ता. वाडी येथील पंपिंग स्टेशन समोर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे बसच्या खिडक्यांना आंदोलकांकडून लक्ष्य करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.