Kamshet : कामशेत बोगद्याजवळ अपघात; दोन जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव वेगात जाणारी कार रस्त्याच्या कठड्याला धडकली. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले.

द्रुतगती मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे कडून मुंबईच्या दिशेने जाणा-या कार (के एल 05 / ए क्यू 9706) चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कठड्याला धडकली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.