Pimpri: राज्यस्तरीय कबड्ड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या खेळाडूंचा गौरव

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्ड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव शाळेतील 14 वर्षीय मुलींच्या कबड्डी संघाने अजिंक्यपद मिळविले. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने संघातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, स्थायीचे सदस्य विलास मडिगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, विकास डोळस, मोरेश्वर शेंडगे, करुणा चिंचवडे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा राऊत उपस्थित होत्या.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय यांच्यातर्फे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान बारामती येथे राज्यस्तरीय कबड्ड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महापालिकेच्या थेरगाव शाळेतील 14 वर्षीय मुलींच्या कबड्डी संघाने अजिंक्यपद मिळविले. विजेत्या संघातील भूमिका गोरे, रुपाली डोंगरे यांची राष्ट्रीय शालेय स्पर्धेत निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.