Pimpri: भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सागर म्हस्के यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सागर म्हस्के यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांनी म्हस्के यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. युवा मोर्चाच्या माध्यमातून सागर म्हस्के यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे म्हस्के खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

आमदार लक्ष्मण जगताप, जगदीश मुळीक, महेश लांडगे यांनी माझ्या कामावर विश्वास दाखविला. त्यामुळेच पुन्हा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी माझी फेरनिवड झाली आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून पक्षवाढीचे काम अधिक जोमाने करणार आहे. सत्तेच्या माध्यमातून पक्षाने केलेली विकासकामे तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे म्हस्के यांनी फेरनिवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.