BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – माहेराहून पैसे आणावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.

ज्योती अंकुश जाधव (वय 31, रा. बालाजीनगर, टेल्को रोड, भोसरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती अंकुश जाधव (वय 31), सासू पद्मिनी जाधव (वय 53), दीर लहू जाधव (वय 34), आशिष ऊर्फ सुधाकर जाधव (वय 30), नणंद विमल अनिल पाखरे (वय 38), नंदावे अनिल पाखरे (वय 45, सर्व रा. तथागत हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती यांचा 2007 मध्ये विवाह झाला. त्यानंतर आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांनी माहेरहून पैसे आणावेत अथवा घर सोडून जावे. सोडचिठ्ठी द्यावी. या कारणावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तसेच ज्योती यांना नांदवून घेण्यास नकार दिला. यवारून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.