Nigdi : 10 ते 12 वर्षे वयोगटातील 7 मुलांकडून 56 सायकल जप्त

मौजमजेसाठी चोरायचे सायकल

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी सायकल चोरी करणा-या सात अल्पवयीन मुलांकडून 4 लाख 17 हजार 500 रुपये किमतीच्या 56 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली. जप्त करण्यात आलेला यामुळे निगडीतील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंकुश चौक परिसरात 10 ते 12 वर्षे वयोगटातील मुले चोरीच्या सायकल विकत असल्याची माहिती कर्मचारी रमेश मावसकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मुलांकडे महागड्या सायकल असल्याचे दिसले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सायकली चोरल्याचे कबूल केले. अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल 56 सायकल चोरल्याचे सांगितले.पोलिसांनी या सर्व सायकल हस्तगत केल्या. विशेष म्हणजे या सर्व सायकल महागड्या असून त्यातील एका सायकलची किंमत 40 हजार रुपये आहे. सायकल चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून शहरातून कोणाच्या सायकल चोरीला गेल्या असतील तर त्यांनी निगडी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, लक्ष्मण सोनवणे, कर्मचारी किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, विलास केकाण, राहुल मिसाळ, विजय बोडके, सोमनाथ दिवटे, गणेश शिंदे, सतीश ढोले, मितेश यादव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.