Pune : मेजर डॉ. विपुल पाटील यांना कोथरूड भूषण’ पुरस्कार 2019 जाहीर

24 ऑगस्ट रोजी होणार प्रदान सोहळा

एमपीसी न्यूज- ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कोथरूड भूषण पुरस्कार २०१९ ब्लॅक कॅट कमान्डो, स्क्रॉड्रन कमांडर एनएसजी मेजर डॉ. विपुल पाटील यांना जाहीर झाला आहे. जम्मू -काश्मीर मध्ये सीमेवर अनेक यशस्वी ऑपरेशन मध्ये सहभाग घेतलेले मेजर विपुल पाटील कोथरूड रहिवासी आहेत. हा पुरस्कार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

हा कार्यक्रम शिक्षकनगर, खेळाचे मैदान उत्सव मंगल कार्यलयाशेजारी, कोथरूड येथे होणार आहे. ‘बढेकर ग्रुप’, ‘वेंकीज’ आणि ‘गोयल गंगा ग्रुप’ हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत. गेल्या 7 वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ट्रस्टच्या वतीने ‘कोथरूडभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून भविष्यात उभारी घेणाऱ्यांना मदत होते.

कोथरूड भूषण पुरस्काराचे पुरस्कारार्थी मेजर डॉ विपुल पाटील यांनी युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक सुवर्णपदक मिळविले आहे. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एन डी ए, ए एफ एम सी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षक आहेत. जगातील सर्वात उंच व खडतर युघक्षेत्र -सियाचीन येथे त्यांनी कार्य केले. आंतरराष्ट्रीय अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे समाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या कोथरूडमधील गुणवंत, कलावंताना ट्रस्ट पुरस्कार देते. हा पुरस्कार ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवादरम्यान नामवंत कलाकाराच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. कोथरूड पुरस्कार मिळणं म्हणजे करिअरमध्ये यशाची गुढी उभारण्यासारखं असतं’ अशी प्रतिक्रिया आत्तापर्यंच्या पुरस्कार्थींनी दिली आहे, असे ट्रस्ट चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.