Wakad : विषारी गोळ्या खायला देऊन विवाहितेचा छळ; दहा जणांवर गुन्हा
एमपीसी न्यूज – आमच्या लायकीप्रमाणे लग्न करून दिले नाही. तुला स्वयंपाक चांगला येत नाही, असे बोलून विवाहितेला उपाशी ठेवून तिला जबरदस्तीने विषारी गोळ्या खायला देऊन मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या दहा जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष गोरख देवकाते, (वय 35), सासू सावित्रा गोरख देवकाते (वय 46), सासरे गोरख केरबा देवकाते (वय 51), दिर नितीन गोरख देवकाते (वय-31), दीपक गोरख देवकाते (वय-33), जाव राणी नितीन देवकाते, चुलत दिर राहूल जालींदर देवकाते, राजू जालींदर देवकाते, चुलत सासू लता जालींदर देवकाते, चुलत सासरे संजय केरबा देवकाते (सर्व रा. पडवळनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेला आरोपींनी लग्नाच्या काही दिवसांनंतर तुझ्या आई-वडिलांनी आमच्या लायकीप्रमाणे लग्न लावून दिले नाही. तुला स्वयंपाक चांगला येत नाही, काम करत नाही, असे बोलून छळ केला. तसेच त्यांना मारहाण करून उपाशी ठेवून जबरदस्तीने विषारी गोळ्या खायला देवून शारिरीक व मानसिक छळ केला. वाकड ठाण्याचे फौजदार व्ही. व्ही. चव्हाण तपास करत आहेत.