Pune : महापालिकेच्या विविध मालमत्तांच्या देखभालीचे काम ‘सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी’ला देणार

कामांसाठी 1350 बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचार्‍यांची नेमणूक करणार; स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या विविध मालमत्तांची देखभाल आणि इतर कामांमध्ये मदत करण्यासाठी १३५० बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. ही नियुक्ती 12 महिन्यांसाठी असणार आहे. यासाठी 22 कोटी 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत. महापालिकेने मागविलेल्या निविदेतील सर्वात कमीची निविदा सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आल्याने हे या काम कंपनीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

सुरक्षा विभाग विविध प्रभाग कार्यालये, उद्याने, स्मशानभूमी, रुग्णालये, जलतरण तलाव, सांस्कृतिक केंद्रे, सामाजिक मंदिरे, प्राणी संग्रहालये, मनपा व्यापलेल्या मालमत्ता, पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या टाक्यांसाठी जबाबदार आहेत. या सर्व ठिकाणी, सुरक्षा ही पालिकेच्या सुरक्षा विभागाची जबाबदारी आहे.

महापालिकेच्या या सर्व विभागांमध्ये ६६६ सुरक्षारक्षकांची आवश्यकता असते. सद्यस्तिथीला स्थायी स्वरूपात कर्मचाऱ्यांची संख्या 394 आहे. त्यापैकी 249 पदे रिक्त आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे करारावर बहुउद्देशीय कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. शासनाच्या नियमानुसार दरमहा प्रति कर्मचारी 13 हजार 627 रुपये भरून ही नियुक्ती केली जात आहे.

1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत नवीन कामाचा आदेश येईपर्यंत होणार काम
सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेबरोबर करार करून सुमारे ६ कोटी ९९ लाख रुपये दिले जातील. वर्क ऑर्डर येईपर्यंत 23 महिन्यांच्या नियुक्तीसाठी 22 कोटी ६ लाख रूपये आणि चार महिन्यांपर्यंत केलेल्या कामांसाठी सुमारे 6 कोटी ९९ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.