Talegaon Dabhade : माळेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास 1 कोटी 7 लाख रुपये मंजूर

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई सुदामराव कदम यांच्या पाठपुराव्यामुळे टाकवे – वडेश्वर मतदार संघातील टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे आंदर मावळ मधील माळेगाव येथे प्राथमिक उपकेंद्राचे नवीन बांधकाम करण्यासाठी 1 कोटी 7 लाख 50 हज़ार रुपये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून मंजूर करुन झाले आहेत.

आंदर मावळातील अतिदुर्गम असणाऱ्या पश्चिम पट्यातील आदिवासी लोकांना या उपकेंद्राचा खूप फ़ायदा होणार आहे. त्यामधे कुणे, अनसुटे , कुणेवाडी , माळेगाव बु!!, पिंपरी,तळपेवाडी, माळेगाव खु !! , सावळा, आढारवाडी ,गोन्टेवाडी, ढोंगेवाडी, कळकराई या सर्व गावातील नागरिकांना उपचारासाठी 30-32 किलोमीटर अंतरावर टाकवे, वडगाव, तळेगाव या ठिकाणी जावे लागत होते. माळेगाव येथे आरोग्य केंद्र सुरु होणार असल्याने या भागातील लोकांना जवळच व पूर्णवेळ आरोग्य सेवा उपलब्ध होईल व जनतेची आरोग्याबाबत होणारी फरपट कमी होणार आहे असे मनोगत जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम यांनी व्यक्त केले. चांगल्या विकासकामांबद्दल टाकवे – वडेश्वर मतदारसंघातुन कदम यांचे कौतुक केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.