Pune : येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचविले एकाचे प्राण

एमपीसी न्यूज – विश्रांतवाडी खाणीमध्ये आशिष टुरडे (वय 30वर्षे, राहणार मुंजाबावस्ती) या व्यक्तीने उडी मारली होती. येरवडा अग्निशामक केंद्रातील ड्रायव्हर रघुनाथ भोईर, फायरमन नवनाथ वायकर, विलिंन रावतू, उमेश डगळे या जवानांनी रस्सीच्या साह्याने खाली उतरून आशिषला पाच मिनिटात बाहेर काढून वाचविले.

हि घटना काल रात्री १२ वाजता घडली. मात्र, आशिषने खाणीमध्ये उडी का मारली होती, हे अद्याप समजले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.