Pune : टांगेवाला कॉलनीतील पूरग्रस्तांना मुस्लीम सहकारी बँकेची मदत

एमपीसी न्यूज- टांगेवाला कॉलनीतील पूरग्रस्तांना मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेतर्फे दैनंदिन उपयोगाचे आणि सणाला उपयोगी पडणारे कपडे, तसेच सतरंजी अशा वस्तूंची मदत करण्यात आली.

बँकेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते 150 पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली. 3 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम टांगेवाला कॉलनी ( अरण्येश्वर ) येथे झाला. मशकूर शेख, उमर शरीफ शेख, नितीन गोराडे, अरिफ शेख, विकी चिकणे, शेरू शेख उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.