Pune : शहरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी – माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे, असे पुणे शहर भाजपच्या अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक दत्ता खाडे, अशोक मुंडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुणे शहरात सभा होणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे मिसाळ म्हणाल्या. या निवडणुकीसाठी सर्वच समाजाचे नेते प्रचारासाठी येणार आहेत. तर, शिवसेनेत ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली. त्यांना समजाविण्याचे काम त्याचे नेतृत्व करणार आहेत. शहरात विधानसभेचा जागा सोडण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे, असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील सावरगाव – घाट येथे दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहे, असेही मिसाळ म्हणाल्या.

मागील वर्षी राष्ट्र संत भगवानबाबा मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या व दसरा मेळावा 2019 सावरगाव (घाट) विषयावर लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन, वंचित व ऊसतोड कामगारांसाठी चालू केलेला व पंकजा मुंडे यांनी यशस्वीपणे पुढे चालू ठेवलेला देशातील सर्वात मोठा दसरा मेळावा ठरलेला आहे, असे दसरा मेळावा कृतीतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.