Maval : भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्तिप्रदर्शन

बाळा भेगडे यांच्या जयघोषाने तळेगाव दुमदुमले

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने तळेगाव दाभाडे येथे भव्य शक्तिप्रदर्शन करत भव्य रॅली काढली. भर पावसात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये तळेगावात तरुण आणि महिलांनी बाळा भेगडे यांचा जयघोष करत तळेगावनगरी दुमदुल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बाळा भेगडे तिसऱ्यांदा भरघोस मताने निवडून येणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पावसाची संततधार सुरू असतानाही तळेगावमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीत असंख्य तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रचार रॅली काढली. प्रचार रॅलीची सुरुवात मारुती मंदिर येथील भाजप कार्यालयापासून करण्यात आली, पुढे जिजामाता चौक, शाळा चौक, दाभाडे आळी, चावडी चौक, डोळसनाथ मंदिर, कुंभार वाडा, भेगडे आळी चौक, गणपती चौक, बाजार पेठ, राजेंद्र चौक, मारुती मंदिर, काळोखेवाडी, खांडगे पेट्रोल पंप, राव कॉलनी, कडोलकर कॉलनी, असे मार्गाक्रमण करत प्रचाराची सांगता तळेगाव दाभाडे मारुती मंदिर चौक येथे करण्यात आली.

यावेळी तरुणांच्या प्रतिसादाने तळेगाव शहर गजबजलेले होते. तरुणांनी दिलेल्या जोरदार घोषणांचा आणि ढोल ताशांचा आवाज संपूर्ण तळेगावात घुमत होता. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही भर पावसात उतरून तरुणांसोबत भिजत रॅलीचा आनंद घेतला. नंतर भेगडे यांना तरुणांनी खांद्यावर बसवून रॅली काढली. यावेळच्या तरुणांचा उत्साह हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मिळणाऱ्या यशाची जणू काही चाहूल देणाराच होता असे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण शहरच भाजपमय झाल्याचे यावेळी दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.