Pune : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वागत
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी पुण्यात भेट दिली. पुणे विमानतळावर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे यांनी अनिल देशमुख यांचे स्वागत केले.
देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे मानले जातात. त्यामुळेच त्यांना या पदावर काम करण्याची संधी दिल्याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पद होते. काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री स्वतंत्र व्यक्तीला देण्यात आले आहे. त्यातही हे पद विदर्भात देण्यात आल्याने खमंग चर्चांना उत आला आहे.