Alandi: एसटी बसमधील टाकीतील 150 लिटर डिझेल चोरले!
एमपीसी न्यूज – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या डिझेल टाकीजवळील कॅनचे नट काढून टाकीतील सुमारे 150 लीटर डिझेल आणि सुमारे 10 हजार रूपये चोरून नेले. हा प्रकार आळंदी एसटी बसस्थानकामध्ये शुक्रवारी (दि.14) रोजी घडला.
याप्रकरणी भगवान रामराव डांगे (वय 42, रा. गोलेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, डांगे हे एसटीमध्ये चालक म्हणून नोकरी करतात. 14 तारखेला पहाटे वंâधार ते आळंदी ही बस घेऊन डांग आले. आळंदी एसटी बसस्थानकात त्यांनी बस उभी केली.
यावेळी चोरट्यांनी बसच्या डिझेल टाकीजवळील कॅनचे नट काढून टाकीतील 150 लीटर डिझेल आणि 10 हजार रूपये चोरून नेले. हा प्रकार सकाळी सात वाजता उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करत आहेत.