Baramati : तरन्नुम सय्यद यांची बारामती नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरन्नुम सय्यद यांची बारामती नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत.

तरन्नूम सय्यद या उच्चशिक्षित अभियंता आहेत. या आधी आरोग्य समितीच्या सभापतीं म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तरन्नूम सय्यद यांना संधी दिली. एकता नागरी महिला पतसंस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत.

आलताफभाई सय्यद ,संचालक – मुस्लिम बँक यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल बारामती मधील अल्पसंख्य समुदाय तसेच मुस्लिम सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.