Bhosri : परिसरात जोरदार पावसाला सुरुवात
एमपीसी न्यूज : भोसरी परिसरात आज ( शुक्रवारी) अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यांनतर गार वारे सुटून पावसाला सुरुवात झाली. काही क्षणात पावसाचा जोर वाढला. दरम्यान, दिघी, चऱ्होली, आळंदी, डुडुळगाव, मोशी या भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.