Pune : भारती विद्यापीठाच्या लवळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘व्हर्चुअल क्लास’ द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने महाविद्यालये बंद आहेत. त्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्याचे सहकार व कृषीराज्यमंत्री व भारती विद्यापीठाचे प्रकुलगूरु डाॅ. विश्वजित कदम आणि कुलपती डाॅ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे येथे ‘व्हर्चुअल क्लास’द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रका प्रमाणे मार्गदर्शन केले जात आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी झूम, गुगल क्लास या सारख्या अॅपस् चा उपयोग करुन प्रत्येक शाखेतील प्रत्येक वर्गाचे तास आॅनलाईन घेतले जातात तसेच अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा भाग असलेले प्रात्यक्षिके ‘आयआयटी’ने निर्देशित केलेल्या ‘व्ही लॅब’ या संकेत स्थळावरुन घेतली जात आहेत. पहिल्या टप्यामधे विविध विषयांचे सूमारे 412 तास अध्यापन करण्यात आले, असल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आरएन पाटील यांनी दिली. या दैनंदिन शिक्षणा बरोबरच या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या कुटुंबाचे मानसिक व शारीरीक स्वास्थ कसे जपावे या विषयीच्या ध्वनीचित्रफितही दाखवण्यात आल्या आहेत.

सद्य परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होण्याच्या संभावना आहेत. याकरीता विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून प्रत्येक विषयाच्या प्रकरणस्वरूप चाचणी परीक्षा ‘एड-हीच’ पोर्टल द्वारे घेतल्या जात आहेत. तोंडी परीक्षांचाही सराव आॅनलाइनच करुन घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना या सर्व उपक्रमांचा लाभ घरबसल्या घेता येत असल्याने शिक्षण घेणे सूलभ झालेले आहे व त्यास शिक्षक ,विद्यार्थि यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पालकांनीही महाविद्यालय घेत असलेल्या या मेहेनिती करीता समाधान व्यक्त केले.

या उपक्रमांचे नियोजन व नियमबद्ध संचलन प्राचार्य डाॅ. आरएन पाटील व सर्व शाखा प्रमूखांद्वारे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.