Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
Greetings to Swatantryaveer Savarkar on behalf of Talegaon Dabhade Municipal Council
एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नगर परिषदेच्या स्वागत कक्षाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांचे हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका मंगल नंदकुमार भेगडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, स्वागत कक्ष प्रमुख रविंद्र काळोखे, प्रवीण माने, विशाल लोणारी, अनिल इंगळे, भिवाजी पिचड, वैशाली आडकर, शीतल कडूसकरसह नगर परिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.