Manchar : बाहेर जाऊन येते असं सांगून गेलेल्या तीन तरुणी चार दिवसांपासून बेपत्ता
Three girls have been missing since four days बेपत्ता झालेल्या तिन्ही तरुणींचे वय 18 वर्षे इतके आहे.
एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील तीन वेगवेगळ्या गावातील तीन तरुणी ह्या मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. कुटुंबियांना त्या बाहेर जाऊन येते असं सांगून गेल्या त्या अद्याप परतल्याच नाहीत. चार दिवसांपूर्वी निघून गेलेल्या या तरुणी अद्यापही घरी परत न आल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पुणे ग्रामीण पोलीस आता या तरूणींचा शोध घेत आहेत.