Weather Report : पुण्यात मध्यम तर मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of moderate to heavy rain in Pune and sparse in Mumbai कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेध शाळेने वर्तवली आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत पोहचला आहे.

गेल्या 14 तासांत कोकण गोव्यात अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : ठाणे 38, मंडणगड 25, श्रीवर्धन 23, माथेरान, म्हसळा, पनवेल, उरण 21 प्रत्येकी, मुंबई (सांताक्रूझ) 20, दापोली, कल्याण 19 प्रत्येकी, भिरा, चिपळूण, पोलादपूर, सांगे, उल्हासनगर 17 प्रत्येकी, दोडा मार्ग 16, बेलापूर (ठाणे), पेण 15 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, खेड, पालघर, वसई 14 प्रत्येकी, कणकवली, राजापूर, सुधागड पाली 13 प्रत्येकी, मुरुड, पेडणे, रोहा, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी 12 प्रत्येकी, अलिबाग, देवगड, कर्जत, खालापूर, लांजा, मालवण, केपे 11 प्रत्येकी, गुहागर, हर्णे, विक्रमगड 10 प्रत्येकी, माणगाव, तलासरी 9 प्रत्येकी, कुडाळ, वैभववाडी 8 प्रत्येकी, कानकोन, जव्हार, महाड, वाडा 7 प्रत्येकी, डहाणू, रामेश्वरी, रत्नागिरी, शहापूर, वेंगुर्ला 6 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), मुरबाड 5 प्रत्येकी, मार्मगोवा 3.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 14, लोणावळा (कृषी) 11, गगनबावडा 10, गिरना (धरण) 8, आजरा 5 प्रत्येकी, जावळी मेधा, कोपरगाव, वेल्हे 4 प्रत्येकी, अमळनेर, चंदगड, इगतपुरी, पाटण, राधानगरी, सटना बागलाण 3 प्रत्येकी, धारणगाव, पन्हाळा, पौड मुळशी, शाहुवाडी, वडगाव मावळ 2 प्रत्येकी, भोर, चाळीसगाव, गडहिंग्लज, कर्जत, कोरेगाव, मुळदे, नांदगाव, नवापूर, पेठ, सातारा, सिन्नर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : सिल्लोड 3, अहमदपूर, अंबड, जाफराबाद 2 प्रत्येकी, आष्टी, भोकरदन, देग्लूर, जळकोट, माहूर, फुलंब्री, उमरगा 1 प्रत्येकी.

विदर्भ : मुल चेरा 11, भामरागड 7, वर्धा 6, चंद्रपूर 5, बुलढाणा, सिरोंचा 4 प्रत्येकी, भिवापूर, कारंजा लाड, कुरखेडा, मालेगाव, मोर्शी, नेर, सेलू 3 प्रत्येकी, अहीरी, चिखली, देऊळगाव राजा, कलमेश्वर, मंगलूर, पातूर, सिंधखेड राजा २ प्रत्येकी, अंजनगाव, बाभुळगाव, बाळापूर, भद्रावती, चामोर्शी, चिमूर, देवळी, एटापल्ली, हिंगणघाट, हिंगणा, कळंब, काटोल, खामगाव, खरंगा, महागाव, मानोरा, मेहकर, नागभीड,  नांदगाव काजी, नरखेडा, रिसोड, उमरेड, वरोरा, वरुड, वाशिम, यवतमाळ  प्रत्येकी.

घाटमाथा : डुंगरवाडी 20, दावडी, शिरगाव 17 प्रत्येकी, ताम्हिणी 16, अम्बोणे 13, लोणावळा (टाटा), कोयना (पोफळी) 11 प्रत्येक, खोपोली 10, लोणावळा (ऑफिस) 9, कोयना (नवजा) 8, वळवण 7, खंद 5, भिवपुरी, शिरोटा 4 प्रत्येकी, वाणगाव 2, ठाकूरवाडी 1.

पुढील हवामानाचा अंदाज :

6 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

7 – 9 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

 

इशारा :

6 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता​. 

7 – 9 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

पुण्यात मध्यम तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्याता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. मुंबई शहर व उपनगर काही ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.