Talegaon : जवानांनी केले कुटुंबियांसमवेत 35,000 वृक्षांचे वृक्षारोपण

Soldiers planted 35,000 trees with their families

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानुसार तसेच त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज (रविवार) अखिल भारतीय वृक्षारोपण अभियानाच्या अंतर्गत समूह केंद्र केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल आणि समूह केंद्र पुणे यांच्यावतीने 35 हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत यामध्ये आंबा, अशोका, चिक्कू आणि संत्री यांसारखी अनेक 35 हजार फळझाडे लावण्यात आलेली आहे. यामध्ये जवानांसोबत त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांनीही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानत, जीवनात वृक्षांचे महत्व खूप आहे आणि यामध्ये लहान मुलांचाही सहभाग तितकाच महत्वाचा असल्याचे यावेळी समूह केंद्र पुणेचे पोलिस उपमहानिरीक्षक बीरेन्द्र कुमार टोप्पो यांनी सांगितले.

यावेळी  रेंज पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक डी.एस.रावत, कमाण्डेन्ट संजीव कुमार, मुख्य चिकित्सा अधिकारी मनीष तिवारी, द्वितीय कमान अधिकारी समुह केन्द्रचे किशोर कुमार आणि केन्द्रीय हथियार भंडार-दो, आई.आई.एम. आणि केरिपुबलच्या संस्थाचे अधिकारी, अधिनस्थ अधिकारी  आणि जवान त्यांच्या कुटुंबियांसमावेत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.