Dehuroad : तडीपार आरोपीला अटक; परवानगीशिवाय शहरात येऊन केला होता महिलेचा विनयभंग

Tadipar accused arrested; The woman was Molestation after coming to the city without permission : आरोपी डब्बू याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

एमपीसी न्यूज – एका तडीपार आरोपीने पोलिसांची परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. तसेच त्याने शस्त्राचा धाक दाखवून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत सोमवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

डब्बु उर्फ हुसेन यामिन शेख (रा. पारशी चाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डब्बू याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला आहे.

तसेच सोमवारी त्याने एका महिलेच्या घरात जाऊन तिला कोयत्याचा धाक दाखवून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेला त्याच्यासोबत फोनवर बोलण्यासाठी जबरदस्तीने तयार केले. याबाबत महिलेने पोलिसात गुन्हा नोंदवला होता.

देहूरोड पोलीस आरोपीचा शोध घेत असताना पोलीस शिपाई सुमित मोरे यांना माहिती मिळाली की, आरोपी डब्बू हा त्याच्या पारशी चाळीतील घरी येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी पारशी चाळ परिसरात सापळा रचून डब्बूला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच त्याचे रेकोर्ड तपासले असता तो तडीपारीची कारवाई झालेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, सचिन शेजाळ, विजय गेंगजे, सुमित मोरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.