Nigdi : ओटास्कीममधून 12 किलो गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

12 kg of cannabis seized from Otaskim; Anti-drug squad action : एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ओटास्कीम, निगडी येथील पेरूची बाग परिसरातून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 12 किलो 300 ग्राम गांजा जप्त करून एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 29) संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.

राजेंद्र सुरेश पवार (वय 21, रा. सिद्धार्थनगर, पत्राशेड झोपडपट्टी, ओटास्कीम- निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप पाटील यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम निगडी येथील पेरूची बाग परिसरात एक तरुण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ  विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी पेरूची बाग परिसरात सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचा 12 किलो 300 ग्राम गांजा आढळून आला.

त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.