New Delhi News : भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका; जीडीपीत 24 टक्क्यांची घसरण

भारतीय अर्थव्यवस्थेतील ही चौथी मंदी असून यापूर्वी 1980 च्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये घट झाली होती.

एमपीसीन्यूज : भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीमधून ही बाब समोर आली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत तब्बल 23.9  टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनाचामुळे पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेची एवढी मोठी पडझड झाल्याचे दिसून येत आहे.

सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट झाल्याचे चित्र दिसत आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीतही ही घट कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त वर्तविण्यात आली आहे.

भारताच्या रियल जीडीपीमध्ये 26.9  लाख कोटींची घट झाली.  मागील वर्षीच्या तुलनेत ही घट 23.9 टक्के इतकी आहे. नॉमिनल जीडीपी 38.08 लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट 22.6 टक्के इतकी आहे.

22.8 टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे. जीडीपीमध्ये 18 टक्क्यांची घट होईल असा अंदाज ‘ब्लुमबर्ग’ने 31 अर्थतज्ज्ञांचा हवाला देत व्यक्त केला होता. कोरोनाचा मुळे पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेची एवढी मोठी पडझड झाल्याचे दिसून येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेतील ही चौथी मंदी असून यापूर्वी 1980 च्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये घट झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.