Lonavala News : कोरोनाच्या मृतदेहांवर लोणावळ्यातच होणार अंत्यसंस्कार

लोणावळा शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर सोय नसल्याने संबंधित मृतदेह रुग्णालयातून तळेगाव येथील स्मशानभूमीत पाठविला जायचा.

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांवर आता लोणावळ्यातच अंत्यसंस्कार होणार आहेत. याकरिता मावळचे प्रांत अधिकारी तथा घटना व्यवस्थापक संदेश शिर्के यांनी आदेश जारी करत भुशी रामनगर येथील स्मशानभूमी आरक्षित केली आहे.

लोणावळा शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर सोय नसल्याने संबंधित मृतदेह रुग्णालयातून तळेगाव येथील स्मशानभूमीत पाठविला जायचा.

तसेच त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी देखील नंबर लागत असल्याने तासंतास मृतदेह शव वाहिनीमध्ये ठेवून ताटकाळत रहावे लागायचे.

यामुळे मृतदेहाची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी लोणावळ्यात अंत्यसंस्काराची सोय करा, अशी सूचना 7 सप्टेंबर रोजी लोणावळा नगरपरिषद सभागृहात झालेल्या बैठकीत पुढे आली होती. यानुसार घटना अधिकारी संदेश शिर्के यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

मृतदेहांची हेळसांड थांबविण्यासाठी लोणावळ्यात स्मशानभूमीची सोय करा, अशी मागणी मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी देखील लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांच्याकडे केली होती.

यानुसार शुक्रवारी भुशी रामनगर येथील स्मशानभूमीत पहिला अंत्यविधी करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.