Khadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 8.56 लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 7 ते 14 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडला.
याप्रकरणी नामदेव भापकर (वय 47, रा. खडकी, पुणे ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक व बॅंक खाते धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भापकर यांना अज्ञात मोबाईल धारकांने फोन वरून संपर्क साधून मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी आपल्या खात्यावर एकूण 8 लाख 56 हजार 600 रुपये जमा करून घेतले व त्यांची आर्थिक फसवणूक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.