Vadgaon Maval : अखेर पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर लागला फलक

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील पोलीस स्टेशन शेजारील रेशनिंग कार्यालयाच्या बाहेर फलक लावण्यात आलेला नव्हता.  त्यामुळे पोलीस स्टेशन आणि रेशनिंग कार्यालय यामध्ये संभ्रम होऊन नागरिकांचा गोंधळ उडायचा, त्याबाबतचे वृत्त एमपीसी न्यूजने प्रकाशित केल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने अखेर पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर फलक लावला आहे. 

वडगाव मावळ येथे पोलीस लाॅकअप रूम आणि रेशनिंग पुरवठा कार्यालय शेजारी शेजारी आहे. लाॅकअप रूमच्या बाहेर फलक आहे, मात्र रेशनिंग कार्यालयाच्या बाहेर फलक नव्हता त्यामुळे अनेकजण थेट लाॅकअप रूमकडे जाऊन त्यांचा गोंधळ उडायचा आणि गैरसोय होत होती. त्याचा पाठपुरावा तळेगाव दाभाडे येथील समाजसेवक दिलीप डोळस यांनी केला होता. त्याबाबतचे वृत एमपीसी न्यूजने 26 आॅगस्ट 2020 रोजी प्रसिद्ध केले, या वृत्ताची दखल घेत पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर फलक लावण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नागरिकांचा गोंधळ व गैरसोय टळणार आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी असलेली लाॅकअप रूम तहसीलदार कार्यालय इमारतीच्या आवारात आहे. या बैठ्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या आवारात पोलीस लाॅकअप रूमच्या बाहेर फलक आहे. शेजारी रेशनिंग कार्यालय आहे. परंतु तेथे कुठलाही तसा फलक नसल्याने रेशनिंगच्या कामासाठी येणा-या अनेक नागरिकांचा गोंधळ उडून कुठे जायचे कळत नव्हते, काही नागरिक थेट लाॅकअप रूममध्ये जात होते. तळेगावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी फलक लावण्याची मागणी करत पाठपुरावा केला. त्यामुळे  आता नागरिकांची गैरसोय होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.