Pune News : माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या
एमपीसी न्यूज : पुण्यातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी – राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांनी त्यांच्या ऑफिसच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.