Chakan Crime : मालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; महिला कामगारावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – मुलाला कंपनीत पार्टनर म्हणून घ्यावे नाहीतर 25 लाख रुपये द्या. अन्यथा तुमच्या विरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून जीवनाची माती करीन, अशी धमकी कंपनीच्या मालकाला एका कामगार महिलेने दिली. तिच्या त्रासाला कंटाळून मालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत कामगार महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार छत्रपती नगर, चाकण येथे घडला.
चंद्रशेखर ज्ञानोबा राऊत (वय 51, रा. छत्रपती नगर, चाकण) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी (दि. 24) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शारदा कारभारी वाबळे (वय 22, रा. वाघजाईनगर, चाकण) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत यांची कंपनी आहे. त्या कंपनीत आरोपी महिला काम करते. जून ते 1 ऑक्टोबर 2020 या कालावधीत तिने तिच्या ‘मुलाला कामावर घ्यावे नाहीतर 25 लाख रुपये द्या. नाहीतर मी तुमच्या विरुद्ध बलात्कार केला असा म्हणून पोलीस केस करेल आणि जीवनाची माती करेल’ अशी वारंवार धमकी दिली. या त्रासाला कंटाळून राऊत यांनी 1 ऑक्टोबर रोजी रात्री दोन वाजता कीटक नाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पोलिसांनी चंद्रशेखर ज्ञानोबा राऊत यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.