Wakad Crime News : भावांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेला आणि तिच्या दोन भावांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने महिलेवर बलात्कार केला. ही घटना जगताप डेअरी चौकातील साईदीप लॉज येथे घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

दीपक हरेश अग्रवाल (वय 28, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 26) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक याने पीडित महिलेला आणि तिच्या दोन्ही भावांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यातून महिलेवर 10 नोव्हेंबर आणि त्यानंतर एके दिवशी महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर या प्रकारची कुठे वाच्यता केल्यास महिलेला आणि तिच्या भावांना मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.